Six cattle rescued at Purnad check post before slaughter: Two arrested पूरनाड तपासणी नाक्यावर कत्तलीपूर्वीच सहा गुरांची सुटका : दोघांना अटक


Six cattle rescued at Purnad check post before slaughter: Two arrested मुक्ताईनगर : कत्तलीसाठी गुरांची वाहतूक होत असताना पूरनाड तपासणी नाक्यावर पोलिसांनी कारवाई करीत सहा गुरांची सुटका केली व दोन जणांना या प्रकरणी अटक करण्यात आली.

कारवाईने उडाली खळबळ
जळगाव जिल्ह्यात मध्यप्रदेशातून रावेर व मुक्ताईनगरमार्गे गुरांची तस्करी केली जात असताना बकरी ईदच्या सणानिमित्त मोठ्या प्रमाणात कत्तलीसाठी गोवंशाची तस्करी केली जात असल्याने पोलीस प्रशासनाने नाकाबंदी सुरू केली आहे. सोमवारी मध्यरात्री पोलीस नाईक नंदकिशोर रामराव धनके, चंद्रशेखर सुरंगे व होमगार्ड प्रशांत पाटील यांनी चारचाकी वाहन (एम.एच.15 एफ.व्ही.4053) ची तपासणी केली असता त्यात सहा गोवंश गुरे आढळल्याने या गुरांची सुटका करीत संशयित विशाल ईश्वर वाघ (21) व साकीर अली रीयाज अली (19, दोन्ही रा.इच्छापूर, ता.बर्‍हाणपूर) यांना अटक केली. 64 हजार रुपयो किंमतीचे गुरे व एक लाख 50 हजार रुपयांचे वाहन असा दोन लाख 14 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तपास सहाय्यक निरीक्षक संदीप दुनगहू करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !