भुसावळातील हनुमान नगरातून व्यापार्‍याची दुचाकी लांबवली


भुसावळ : शहरातील हनुमान नगर भागातून चोरट्यांनी 35 हजार रुपये किंमतीची दुचाकी लांबवली. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

दुचाकी चोरट्यांचा उच्छाद थांबेना
ईशान भगवानदास दर्डा (हनुमान नगर, भुसावळ) हे व्यापारी असून त्यांच्याकडे अ‍ॅक्टीवा दुचाकी (एम.एच.30 बी.एच.8415) असून 25 ते 26 च्या मध्यरात्री चोरट्यांनी संधी साधून घराबाहेरून दुचाकी लांबवली. तपास नाईक उमाकांत पाटील करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !