भुसावळ बसस्थानकातून युवतीचाही मोबाईल लांबवला


The girl’s mobile phone was also stolen from Bhusawal bus station भुसावळ : शहरातील बसस्थानकात बसच्या प्रतीक्षेत असलेल्या अपर्णा सिद्धार्थ कोतकर (23, आंबेडकर नगर, भुसावळ) या युवतीचा मंगळवारी दुपारी साडेचार वाजता दहा हजार रुपये किंमतीचा मोबाईल अज्ञात भामट्यांनी लांबवला.

चोरट्याविरोधात गुन्हा
या प्रकरणी युवतीने तक्रार दिल्यावरून अज्ञाताविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार रमण सुरळकर करीत आहेत.

 






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !