कपिलनगर वस्तीतील तरुणाचा विजेचा शॉक लागून मृत्यू
Youth in Kapilnagar slum dies due to electric shock भुसावळ : तालुक्यातील वरणगावजवळील कपिलनगर वस्तीत पत्र्यांवर लोखंडी पाईप टाकणार्या तरुणाचा विद्युत स्पर्शाने मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी 12.30 वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी वरणगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. अरविंद मधुकर बावस्कर (18, कपिलवस्तीनगर, ता.भुसावळ) असे मयताचे नाव आहे.
विद्युत शॉक लागताच मृत्यू
सूत्रांच्या माहितीनुसार, कपिलवस्तीनगर भागातील तरुण अरविंद हा घराच्या पत्र्यांवर 20 फुटी लोखंडी पाईप टाकत असताना या पाईपाचा वीज तारांना स्पर्श होताच जोरदार शॉक बसल्याने तरुण खाली पडला. त्यास बेशुद्धावस्थेत उपचारार्थ वरणगाव ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतर वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याबाबत रमेश मोतीराम चव्हाण (60, कपिल नगर वस्ती) यांच्या खबरीवरून वरणगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस हवालदार मनोहर पाटील करीत आहेत.
