भुसावळ शहरात नाल्यात पडून वयोवृद्धेचा मृत्यू


भुसावळ  : शहरातील खडका रोड भागातील बहारे मदिना मशिदीजवळील नाल्याच्या डबक्यात पडल्याने 75 वर्षीय वयोवृद्धेचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी घडली. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. फरीदा बानो इकबाल सैय्यद (75, खडका रोड, सत्यसाई नगर, भुसावळ) असे मयताचे नाव आहे.

नाल्यात पडल्याने मृत्यू
फरीदा बानो या घराबाहेर पडल्यानंतर बहारे मदिना मशिदीजवळील नाल्यात पडल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. सायंकाळी उशिरा हा प्रकार लक्षात आला. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास नाईक समाधान पाटील करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !