भुसावळ शहरातील 30 वर्षीय विवाहितेचा विनयभंग
30-year-old married woman molested in Bhusawal city भुसावळ : शहरातील खडका रोडवरील लाल बिल्डींग परीसरातील 30 वर्षीय विवाहितेचा विनयभंग करण्यात आला तसेच तिच्याशी अश्लील संवाद साधण्यात आला. या प्रकरणी संशयीत रहिम नबी बागवान (खडका रोड, भुसावळ) याच्याविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा
30 वर्षीय पीडीतेच्या तक्रारीनुसार, संशयीत रहिम बागवान याने मंगळवार, 27 रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास पीडीतेचा हात पकडून तिच्याशी अश्लील वर्तन करीत तिच्या मनाला लज्जा निर्माण होईल, असे कृत्य केले. या प्रकरणी पीडीतेने धाव घेत बाजारपेठ पोलिसात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार नेव्हील बाटले करीत आहेत.

