एस.टी.त क्लर्कपदी नोकरीच्या बहाण्याने भुसावळातील तरुणाला चार लाखांचा गंडा : दोघांविरोधात गुन्हा


A young man from Bhusawal was extorted Rs 4 lakh on the pretext of working as a clerk in ST :  a case against both भुसावळ : एस.टी.महामंडळात क्लर्क पदावर नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने दोघांनी शहरातील तरुणाला चार लाख सात हजारांचा गंडा घालत खोटे कागदपत्र देवून फसवणूक केली. या प्रकरणी तरुणाच्या तक्रारीवरून दोघांविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

दोघांविरोधात गुन्हा
अविनाश सुभाष तायडे (28, म्हाडा कॉलनी, वांजोळा रोड, भुसावळ) यांच्या तक्रारीनुसार, संशयित कोमल धनसिंग पाटील व प्रकाश भास्कर पारधे (श्रीराम नगर, यावल) यांनी एस.टी.महामंडळात तक्रारदाराला क्लर्क पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत त्यांच्याकडून चार लाख सात हजार रुपये उकळले मात्र नोकरी न लागल्याने फसवणूक झाल्याची खात्री होताच तरुणाने पैसे मागितल्यानंतरही संशयितांनी ते परत न केल्याने या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. तपास हवालदार गणेश चौधरी करीत आहेत.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !