कोळन्हावी येथील अल्पवयीन मुलीचे अपहरण : एकाला अटक


Kidnapping of a minor girl in Kolnhavi : One arrested यावल : तालुक्यातील कोळन्हावी येथून 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आल्याप्रकरणी संशयित तरुणाला पोलिसांनी अटक केली. त्यास भुसावळ येथील विशेष न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने संशयीताला 5 जुलैपर्यंत सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या गुन्ह्यांमध्ये बालकांचे लैंगिक अत्याचार पासून संरक्षण कायदा पोस्कोचे कलम वाढवण्यात आले.

आरोपीविरोधात पोस्कोचे कलम वाढवले
कोळन्हावी येथील एका अल्पवयीन 16 वर्षीय मुलीचे अपहरण करण्यात आले होते. या प्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल होता व यावल पोलिसांनी या गुन्ह्याच्या तपास करतांना पवन सुभाष सोळुंके (कोळन्हावी) याला अटक केली. त्याला भुसावळ येथील विशेष बाल न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 5 जुलैपर्यंत सहा दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. या गुन्ह्यामध्ये बालकांचे लैंगिक अत्याचारपासून संरक्षण कायदा पोस्को अन्वये नवीन कलम वाढवण्यात आले. तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे करीत आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !