साकळी मंडळाधिकर्‍यांवर हल्ला करून पळवलेले ट्रॅक्टर पोलिसांनी घेतले ताब्यात : संशयितांचा कसून शोध


Police seized the tractor that attacked and ran away from Sakli board officials: Thorough search for the suspects यावल : तालुक्यातील साकळी गावाजवळ मंडळाधिकारी यांच्यावर हल्ला करून वाळु माफीयांनी ट्रॅक्टर पळवून नेले होते. या प्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर यावल पोलिसांच्या पथकाने शिरसाड शिवारातून हे ट्रॅक्टर ताब्यात घेतले. संशयीतांच्या शोधाकरीता पोलिसांचे पथक रवाना झाले आहे.

संशयितांच्या शोधार्थ पथक रवाना
साकळी, ता.यावल गावाजवळ 26 जून रोजी वाळू माफियांनी मंडळ अधिकारी सचिन जगताप यांच्यावर हल्ला केला होता व हल्ला करून अवैद्य वाळू वाहतुकीचे ट्रॅक्टर पळवून नेले होते. या प्रकरणी यावल पोलिसात ट्रॅक्टर मालक सुपडू रमेश सोळुंके, चालक आकाश अशोक कोळी, गोपाळ प्रल्हाद सोळुंके (कोळन्हावी) या तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात जे ट्रॅक्टर पळवून नेण्यात आले ते ट्रॉलीसह शिरसाड शेत शिवारात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांना मिळाली होती. त्यांनी पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे, मुजफ्फर खान, सुशील घुगे, वसीम तडवी, पंकज फिरके, विजय जावरे, संदीप कोळी या पथकास शोध घेण्यास पाठवले व शेत शिवारात लपवून ठेवलेले ट्रॅक्टर-ट्राली पोलिसांनी ताब्यात घेतली आहे तर दोन विशेष पथक संशयीतांच्या शोधाथ रवाना झाले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !