साकळी मंडळाधिकार्‍यांवर हल्ला : एका आरोपीला अटक


Attack on Sakli board officials: One accused arrested यावल : तालुक्यातील साकळी गावाजवळ मंडळाधिकारी यांच्यावर हल्ला करून वाळु माफीयांनी ट्रॅक्टर पळवून नेले होते. या प्रकरणी यावल पोलिसात तीन जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. त्यातील एका संशयीताला पोलिसांनी तापी नदीच्या काठावरून अटक केली तर तर इतर पसार दोघांचा शोध पोलीस घेत आहेत.

यावल पोलिसा गुन्हा दाखल
साकळी गावाजवळ 26 जून रोजी वाळू माफियांनी मंडळ अधिकारी सचिन जगताप यांच्यावर हल्ला केला व हल्ला करून अवैध वाळू वाहतुकीचे ट्रॅक्टर व ट्राली पळवून नेली. या प्रकरणी यावल पोलिसात ट्रॅक्टर मालक सुपडू रमेश सोळुंके, चालक आकाश अशोक कोळी, गोपाळ प्रल्हाद सोळुंके (कोळन्हावी) या तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

नदी काठावरून केली अटक
या गुन्ह्यात जे ट्रॅक्टर पळवून नेण्यात आले होते ते ट्रॉलीसह शिरसाड शेत शिवारातून पोलिसांनी ताब्यात घेतले व आता कोळन्हावीजवळील तापी नदीच्या काठावर संशयीत आरोपी गोपाळ प्रल्हाद सोळुंके हा लपून बसल्याची माहिती पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांना मिळाल्याने त्यांनी पथकाला कारवाईचे निर्देश दिल्यानंतर उपनिरीक्षक सुनील मोरे, सहायक फौजदार मुजफ्फर खान, सुशील घुगे, एजाज गवळी आदींनी गोपाळ सोळुंके यास अटक केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !