केर्‍हाळा गावातील युवकाची नदीपात्रात आत्महत्या


A youth in a Kerala village committed suicide in a riverbed रावेर : तालुक्यातील निंभोरासिम येथील तापी नदीच्या पुलावरुन केर्‍हाळा येथील 39 वर्षीय युवकाने उडी घेत आत्महत्या केली. संदीप ब्रह्मानंद महाजन (39, रा.केर्‍हाळा, ह.मु.विटवा, ता.रावेर) असे मृत युवकाचे नाव आहे. शनिवारी सकाळी 11 वाजता ही घटना घडली.

याबाबत निंभोरा पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास सहाय्यक निरीक्षक गणेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक नितीन पाटील करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !