पिंप्रीअकराऊतचा तरुण दुचाकी अपघातात ठार ; अन्य एक गंभीर
Youth of Pimpri Akraut killed in two-wheeler accident; Another serious one मुक्ताईनगर : भरधाव दुचाकी दुभाजकावर आदळल्याने झालेल्या अपघातात पिंप्रीअकराऊत येथील तरुणाचा मृत्यू झाला तर अन्य एक जण जखमी झाला. हा अपघात पिंप्री अकाराऊत गावाजवळ घडला. चेतन भिका भंवर (25, रा.पिंप्री अकाराऊत, ता.मुक्ताईनगर) असे मयत तरुणाचे नाव आहे.
दुभाजकावर दुचाकी आदळून अपघात
मुक्ताईनगर तालुक्यातील पिंप्री अकाराऊत गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावर दुचाकी (क्रमांक एम.एच.19 डी.एच.2048) ने चेतन भिका भवर (27) व वैभव अनिल माळी (22) येत असताना दुचाकी दुभाजकावर आदळल्याने चेतनचा जागीच मृत्यू झाला तर वैभव माळी हा जखमी झाला.
अपघाताची माहिती मिळताच परीसरातील ग्रामस्थांनी अपघातस्थळी धाव घेतली. वैभव माळी यांना उपचारासाठी उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले तर, चेतन भिका भवर यांच्या मृत्यूमुळे परिसरावर शोककळा पसरली आहे. मुक्ताईनगर पोलिसात अपघात प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास एएसआय संजीव पाटील करीत आहेत.
