यावल तालुक्यातील तरुणीवर लग्नाच्या आमिषाने अत्याचार : वडगावच्या तरुणाला अटक
Youth of Yaval taluka assaulted by lure of marriage : Youth of Vadgaon Arrested यावल : यावल तालुक्यातील एका गावातील 32 वर्षीय तरुणीशी प्रेमसंबंधानंतर तिच्यावर लग्नाच्या आमिषाने वारंवार अत्याचार करण्यात आला व त्यातून पीडीता तब्बत तीन वेळा गर्भवती राहिली मात्र त्यानंतरही तरुणाने लग्न करण्यास नकार दिल्याने तरुणीने फैजपूर पोलिसात तक्रार दिल्यानंतर संशयित रामचंद्र संघरत्न वाघोदे (वडगाव, ता.रावेर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयिताला अटक करण्यात आली. या घटनेने यावल तालुक्यात खळबळ उडाली आहे.
सुमारे सहा वर्ष तरुणीवर अत्याचार
यावल तालुक्यातील 32 वर्षीय तरुणीशी संशयित रामचंद्र याने प्रेमसंबंध प्रस्थापीत करीत लग्नाचे आश्वासन दिले मात्र गारबर्डी धरण, भुसावळातील दोन हॉटेल्समध्ये 2017-2018 ते आतापर्यंत वेळोवेळी आरोपीने नेत तिच्यावर इच्छेविरोधात शारीरीक संबंध ठेवून अत्याचार केल्याने पीडीता तीनेवळा गर्भवती राहिली मात्र आरोपीने आयुर्वेदिक गोळ्या देवून पीडीतेचा गर्भपात केला. फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर तरुणीने फैजपूर पोलिसात तक्रार दिल्यानंतर आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली. तपास सहाय्य निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक एम.जे.शेख करीत आहेत.
