भुसावळातील प्रभाग सातमध्ये एक कोटींच्या निधीतून रस्ते काँक्रीटीकरण कामाचे भूमिपूजन
नगरसेविका अनिता सतीश सपकाळे व सतीश सपकाळेंचा पाठपुरावा
Bhoomipujan, a work worth one crore in seven in Bhusawal region भुसावळ : शहरातील प्रभाग क्रमांक सातमध्ये माजी नगरसेविका अनिता सपकाळे व सामाजिक कार्यकर्ते सतीश सपकाळे यांच्या पाठपुराव्याने प्रभागात एक कोटी रुपयांच्या निधीतून रस्ता काँक्रिटीकरण कामाला स्थानिक आमदार निधीतून मंजूरी मिळाली. या कामाचे आमदार संजय सावकारे यांच्याहस्ते भूमिपूजन करण्यात आले. पालिका हद्दीबाहेरील भागात यापूर्वी रस्त्यांची कामेच झाली नव्हती, या कामांमुळे नागरीकांना दिलासा मिळाला आहे.
एक कोटींचा निधी मंजूर
शहरातील प्रभाग सातमधील गोदावरी नगर, महालक्ष्मी नगर, मोरेश्वर नगर, भिरुड कॉलनी आदी परीसरातील रस्त्यांच्या काँक्रीटीकरण कामांसाठी एक कोटी रुपयांचा निधी स्थानिक आमदार निधीतून मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून होणार्या कामांचे गुरुवारी आमदार संजय सावकारे यांच्याहस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक मनोज बियाणी, राजेंद्र आवटे, मुकेश पाटील, अजय नागराणी, देवेंद्र वाणी, रमाकांत महाजन, भाजप शहराध्यक्ष परिक्षीत बर्हाटे, किरण कोलते, किरण महाजन, विशाल जंगले, साकेगावचे सरपंच आनंद ठाकरे, रमाशंकर दुबे, अनिरुध्द कुलकर्णी, चेतन सावकारे, अॅड. एन.डी.चौधरी, प्रा.एस.डी.चौधरी आदींसह नागरीक उपस्थित होते. कामाच्या भूमिपूजानंतर रस्ता काँक्रिटीकरण कामाला सुरवात करण्यात आली. अल्पावधीत हा रस्ता पूर्ण केला जाणार असल्याने नागरीकांना दिलासा मिळाला आहे.

विकासासाठी अजून कोटींचा निधी देवू
पालिकेच्या हद्दीबाहेर असलेल्या प्रभाग सातच्या विकासासाठी मोठा निधी दिला आहे. हा भाग आगामी काळात पालिका हद्दीत जोडला जाणार आहे. यानंतर या भागात गटारींचे कामे पूर्ण केले जाणार आहे. या भागाच्या विकासात्मक कामांसाठी आगामी काळातही एक कोटी रुपयांचा निधी देवू. आगामी काळात गोदावरी नगरात अभ्यासिका उभारली जाईल, असे आश्वासन यावेळी आमदार संजय सावकारे यांनी दिले.
