भुसावळात अज्ञात वाहनाने पादचाार्‍याला चिरडले


A pedestrian was crushed by an unknown vehicle in Bhusawal भुसावळ  : रस्ता ओलांडणार्‍या 60 ते 65 वर्षीय अनोळखी पादचार्‍याला अज्ञात वाहनाने चिरडल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील साकेगावजवळील गणेश अ‍ॅटो गॅरेजसमोर शनिवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली.

अज्ञाताची ओळख पटवण्याचे आवाहन
भानखेडा पोलीस पाटील शरद रघुनाथ पाटील (43) यांनी भुसावळ तालुका पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, शनिवारी सकाळी साडेसात वाजेपूर्वी अज्ञात वाहनाने धडक दिल्याने रस्ता ओलांडणार्‍या 60 ते 65 वर्षीय अनोळखीचा मृत्यू झाला. अपघातानंतर अज्ञात वाहन चालकाने पळ काढला. या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अज्ञाताची अद्याप ओळख पटलेली नाही. तपास सहाय्यक निरीक्षक अमोल पवार करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !