कजगावात जुन्या वादातून तरूणावर प्राणघातक हल्ला : त्रिकूटाविरोधात गुन्हा
Assault on youth over old dispute in Kajgaon: Crime against trio भडगाव : भडगाव तालुक्यातील कजगाव येथे जुन्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. ही घटना कजगाव येथील शीतल हॉटेलमध्ये शुक्रवारी रात्री 11 वाजता घडली. या प्रकरणी त्रिकूटाविरोधात भडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयितांच्या हल्ल्यात चेतन निवृत्ती पवार (30, कजगाव) हा तरुण जखमी झाला.
तिघांविरोधात गुन्हा दाखल
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, शुक्रवार 30 जून रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास मागील भांडणाच्या कारणावरून दीपक लालसिंग पाटील, जय दीपक पाटील आणि पियुष दीपक पाटील या तिघांनी चेतन पवार याला लाकडी दांडक्याने मारहाण केली तसेच एकाने धारदार वस्तूने पोटावर वार करून गंभीर दुखापत करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या संदर्भात चेतन पवार याचा चुलत भाऊ समाधान ज्ञानेश्वर पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी दीपक लालसिंग पाटील, जय दीपक पाटील, पियुष दीपक पाटील या तिघांविरोधात भडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रसेन पालकर करीत आहे.
