टाकळी शेत शिवारातून 20 हजारांचे शेती साहित्य लांबवले
मुक्ताईनगर : टाकळी शेत शिवारातून चोरट्याने 20 हजार रुपये किंमतीचे शेती-साहित्य लांबवल्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी एकाविरोधात मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
संशयिताविरोधात गुन्हा दाखल
संतोष श्रीराम चव्हाण (52, टाकळी) यांचे टाकळी शिवारात गट क्रमांक 12/2 मध्ये शेत आहे. 29 ते 30 जूनदरम्यान संशयित बाळू ममराज जाधव (टाकळी) याने शेतातून 15 हजार रुपये किंमतीचे ठिबक नळ्या व पाच हजार रुपये किंमतीचे सुप्रीम कंपनीचे पाईप असे एकूण 20 हजारांचे साहित्य चोरून नेल्याचा आरोप शेतकर्याने केल्याने संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास नाईक विनोद सोनवणे करीत आहेत.
