‘तेरी मम्मी ने साडी दिखाने के लिए मंगवायी है’ म्हणत भुसावळातून भामट्याने दहा हजारांच्या साड्या लांबवल्या
Bhamtya extended ten thousand sarees from Bhusawal भुसावळ : शहरातील जामनेर रोडवरील सोनी साडी सेंटरमधून भामट्याने दुकानदार महिलेने साड्या दाखवण्यासाठी मागितल्याच्या कारण सांगून दहा हजार 200 रुपये किंमतीच्या साड्या लांबवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी अज्ञाताविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
आशा कमलेश रण (38, वाल्मीक नगर, भुसावळ) यांचे जामनेर रोडवर सोनी साडी सेंटर नामक दुकान आहे. शनिवार, 1 जुलै रोजी रण यांचा मुलगा दुकानावर असताना अनोळखी इसमाने ‘तेरी मम्मी ने साडी दिखाने के लिए मंगवायी है’ म्हणत आठ हजार 400 रुपये किंमतीच्या 28 कॉटनच्या साड्या तसेच एक हजार 800 रुपये किंमतीच्या चार सिंथेटीक प्रिंटेड साड्या लांबवल्या. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर आशा रण यांनी बाजारपेठ पोलिसात धाव घेत तक्रार दिल्यावरून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक यासीन पिंजारी करीत आहेत.
