मोदी सरकारच्या काळात सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून कामे : अशोक कांडेलकर


Modi government’s work by considering the common people as the center : Ashok Kandelkar
मुक्ताईनगर :
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात सर्वसामान्य व्यक्तीला केंद्रबिंदू जनहिताची कामे झाल्याचे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक कांडेलकर म्हणाले. मुक्ताईनगर येथे भारतीय जनता पक्षाच्या आयोजित पत्रकार परीषदेत ते बोलत होते. मोदी एट नाईन या मोहिमे अंतर्गत विविध प्रकारच्या सेवा सुशासन गरीब कल्याण योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचे संदर्भात पत्रपरीषद झाली. जनधन खात्यामार्फत 80 कोटी लाभार्थींना कल्याणकारी योजनांचा फायदा मिळवून देण्यात आला, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तीन कोटी जनतेला मोफत घरे, मुद्रा योजना, आयुष्यमान भारत कृषी योजना यासह ठिबक सिंचन प्रणालीमध्ये 80 टक्के सबसीडी देण्यात आल्याचे पदाधिकारी म्हणाले.

यांची पत्रकार परीषदेला उपस्थिती
प्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष अशोक कांडेलकर, विधानसभा क्षेत्रप्रमुख ललित महाजन, समाज कल्याण माजी सभापती जयपाल बोदडे, तालुका सरचिटणीस चंद्रकांत भोलाणे, विनोद पाटील, राहुल राणे, पंचायत समिती सदस्य राजेंद्र सवळे, शहराध्यक्ष पंकज कोळी, तालुका चिटणीस संजय तितूर, संतोष धनके, स्वप्निल नाव्हकर, अमोल तायडे प्रमुख उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !