सांगवी खुर्द शाळेत विद्यार्थ्यांना लेखन साहित्याची भेट
यावल : यावल तालुक्यातील जिल्हा परीषद प्राथमिक शाळा सांगवी खुर्द येथे भुसावळ येथील के.नारखेडे विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक सुनील पाठक व यावलच्या साने गुरूजी विद्यालयाचे उपशिक्षक नरेंद्र नेवे यांच्या माध्यमातून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सील असे लेखन साहित्याचे वाटप करण्यात आले.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
अध्यक्षस्थानी सांगवी खुर्द ग्रामपंचायत सदस्या दुर्गा कोळी होत्या. सरपंच ज्योती कोळी, अंगणवाडी कर्मचारी अरुणा तायडे, पालक उपस्थित होते. जयश्री काळवीट यांनी सुनील पाठक यांच्या कार्याचा परीचय दिला तसेच गेल्या 26 वर्षांपासून अध्यापन कार्य करणार्या पाठक यांना मिळालेल्या राज्यस्तरीय पुरस्कारांची माहिती दिली. नरेंद्र नेवे यांनी त्यांच्या भाषणातून विद्यार्थ्यांना मोबाईल कमी वापरण्याचा उपदेश केला. सूत्रसंचालन उपशिक्षिका जयश्री काळवीट यांनी तर प्रास्ताविक वैशाली पाटील यांनी मानले.

