प्रशासन गतिमान करून नागरीकांची कामे वेळेत पूर्ण करणार : भुसावळच्या नूतन तहसीलदारपदी निता लबडे


The administration will speed up the work of citizens and complete it in time: Nita Labde as the new tehsildar of Bhusawal भुसावळ : भुसावळच्या तहसीलदारपदी अमरावती विभागातून निता लबडे यांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर सोमवार, 3 जुलै रोजी सकाळी त्यांनी भुसावळ तहसीलदारपदाची सूत्रे स्वीकारली. याप्रसंगी सहकार्‍यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. लबडे या यापूर्वी भातकुली तहसीलदार म्हणून कार्यरत होत्या.

नागरीकांची प्रलंबित कामे वेळेवर पूर्ण करण्यावर प्राधान्य
पदभार घेतल्यानंतर त्या म्हणाल्या की, प्रशासन गतिमान करून नागरीकांची कामे वेळेवर करण्यावर आपला भर असेल शिवाय कर्मचार्‍यांवर आपला वचक असेल, अशीच कृती आपण करणार आहोत. गेल्या 15 दिवसांपासून तहसीलदार नसल्याने अनेक कामे प्रलंबित असून ही कामे करण्यावर आपला भर असून विद्यार्थ्यांना वेळेत दाखले देण्यासाठी आपला प्रयत्न असेल, असेही त्यांनी सांगितले. तहसील कार्यालयात दलालांचा सुळसुळाट वाढला असून या संदर्भात त्यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, दलालांचा निश्चितच बंदोबस्त करण्यात येईल.

भातकुली पॅटर्न भुसावळातही राबवणार
नूतन तहसीलदार म्हणाल्या की, भातकुली (अमरावती) येथे कार्यरत असताना अवैधरीत्या गौण खनिजाची वाहतूक करणार्‍यांवर धडक कारवाई करण्यात आली तसेच तसेच महा ई सेवा केंद्रातून रेशनकार्ड वाटप, विधवा-अपंग-परीतक्त्यांना स्त्रियांना रेशनधान्य व संजय गांधी निराधार योजनांचा लाभ मिळवून दिला तसेच नागरीकांच्या कामांचा जलदगतीने निपटारा केल्याने हा पॅटर्न भुसावतळही निश्चितच राबवला जाईल.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !