कोरपावली येथे शेतात काम करताना 40 वर्षीय महिलेला सर्पदंश
A 40-year-old woman was bitten by a snake while working in the field at Korpavali यावल : तालुक्यातील कोरपावली शेत-शिवारामध्ये शेतात काम करत असताना एका 40 वर्षीय महिलेला सर्पदंश झाला. हा प्रकार निदर्शनास येताच महिलेला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
शेतात काम करताना सर्पदंश
कोरपावली, ता.यावल येथील शेतशिवारामध्ये अर्चना जवाहरलाल चौधरी (40) ही महिला निंदनीचे काम करीत असताना महिलेच्या डाव्या हाताला अचानक सापाने दंश केला. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर महिलेला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारार्थ आणण्यात आले. रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ.मोहिनी भुगवाड्या, अधिपरीचारीका नेपाली भोळे, सुमन राऊत, पिंटू बागुल आदींनी तिच्यावर उपचार केले. महिलेची प्रकृती सध्या स्थिर आहे.
