मनशांतीसाठी गुरूशिवाय पर्याय नाही : संत गोपाल चैतन्यजी महाराज


पाल, ता.रावेर : आजच्या कलियुगात मनुष्यलोक हा समृद्ध जरी असला परंतु त्याला शांती मिळत नसल्यास मनशांती प्राप्त करण्यासाठी गुरुचे द्वार व संतांचे सानिध्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही. नम्रता ही त्याची शिदोरी आहे, असे विचार श्री वृंदावन धाम पाल आश्रमाचे गादिपती श्री लक्ष्मण चैतन्य बापुजी यांचे कृपापात्र शिष्य श्रद्धेयय संत श्री गोपाल चैतन्यजी महाराज यांनी व्यक्त केले. गुरुपौर्णिमेनिमित्त श्री वृंदावम धाम, पाल आश्रमात आलेल्या भाविक भक्तांना आपल्या अमृत वाणीतून प्रवचन देताना ते बोलत होते. सोमवार, 3 जुलै रोजी गुरुपौर्णिमेनिमित्त सातपुड्यातील पाल येथील सदगुरु प.पू.संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी आश्रम, श्री वृंदावन धाम येथे देशभरातून पन्नास हजारांवर चैतन्य साधक भक्त परीवारातील सदस्य गुरु दर्शनार्थ दाखल झाले आहेत.

दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम
गुरुपौर्णिमेनिमित्त पाल वृंदावन धाम आश्रमातील श्री हरिधाम मंदिरात विराजित परम पूज्य सद्गुरु संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजींच्या समाधी स्थळी पहाटे पाच वाजेला सदगुरु पादूका पूजन, आरती तसेच दर्शनाला सुरुवात करण्यात आली.त्याचप्रमाणे सकाळी सात वाजेला गुरुदीक्षा व चैतन्य ध्वजारोहण करण्यात आले. सकाळी नऊ वाजेपासून ध्यान, साधना, प्रार्थना, गुरुपुष्पांजली भजन व श्रद्धेय संत श्री गोपाल चैतन्यजी महाराजांनी आपल्या अमृत वाणीतून भाविकांना मार्गदर्शन केले. यावेळी दहावी-बारावीत 90 टक्क्यांवर गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. मद्याच्या आहारी गेलेल्यांना पाल आश्रमातर्फे गोपाल चैतन्यजी महाराज यांच्या हस्ते निशुल्क औषधीचे वितरण करण्यात आले व वृक्षारोपण अभियानातून भाविकाना एक हजार आंबे, लिंबू, फणसाचे रोप निशुल्क वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे पार्किंग सेवा, आरोग्य सेवा, सत्संग पांडाल, पूज्य बापूजी समाधी दर्शन सेवा, अश्या विविध सेवेमध्ये प्रशासनासोबत चैतन्य युवा सेक्युरीटी संघाने हातभार लावला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !