केवायसी अपडेटच्या नावाखाली भुसावळातील वृद्धाला एक लाखांचा गंडा


An old man in Bhusawal was extorted Rs 1 lakh in the name of KYC update भुसावळ : शहरातील सेवानिवृत्त कर्मचार्‍याला स्टेट बँकेतून बोलत असल्याचे भासवून केवायएसी अपडेटच्या करण्याच्या नावाखाली तब्बल एक लाखात गंडवण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बाजारपेठ पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

फेक मेसेज, कॉलपासून सावध राहण्याचे पोलिसांचे आवाहन
शहरातील जामनेर रोडवरील पंढरीनाथ नगरातील रहिवासी असलेले सेवानिवृत्त कर्मचारी गौतम नामदेव खरे (वय 63) यांना 22 जानेवारी 2023 रोजी सायंकाकळी पावणेसहा वाजता एका मोबाईल वरून मॅसेज आला की, आपले स्टेट बँक ऑफ इंडियाचे अकाउंट केवायसी अपडेट करायचे आहे. त्यासाठी खालील लिंक ओपन करून माहिती भरावी. गौतम खरे यांना मॅसेज खरा वाटल्याने त्यांनी लिंक ओपन करून सर्व माहिती त्यात भरली. यानंतर त्यांच्या खात्यातील तब्बल एक लाख रुपये अज्ञात व्यक्तीने परस्पर काढून घेतले. पैसे खात्यातून पैसे कपात झाल्याचे लक्षात येताच खरे यांनी बाजारपेठ पोलीस स्टेशनला धाव घेत अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला. तपास पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !