हजयात्रेला नेण्याच्या आमिषाने भुसावळातील हॉटेल व्यावसायीकाला चार लाख 20 हजारांचा गंडा
Hotel businessman in Bhusawal extorted Rs 4 lakh 20 thousand for taking pilgrims भुसावळ : हजयात्रेला नेण्याच्या आमिषाने शहरातील हॉटेल व्यावसायीक दाम्पत्याला चार लाख 20 हजारांचा गंडा घालण्यात आला. या प्रकरणी एका संशयिताविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
एकाविरोधात पोलिसात गुन्हा दाखल
शेख आसीफ शेख अय्युब (45, नई ईदगाह, खडका चौफुली, भुसावळ) हे हॉटेल व्यावसायीक असून त्यांच्या परीचयातील संशयित शेख आबीद शेख हसन (उस्मानिया कॉलनी, खडका रोड, भुसावळ) यांनी हज यात्रेला नेण्याचे आमिष दाखवून 23 फेब्रुवारी 2018 ते 10 जानेवारी 2023 दरम्यान वेळोवेळी चार लाख 20 हजार रुपये उकळले मात्र यजयात्रेला नेले नाही व पैसेही परत न केल्याने फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर संशयिताविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. तपास नाईक तुषार केशव पाटील करीत आहेत.
