आडगाव चौफुलीजवळून अज्ञात चोरट्याने दुचाकी लांबवली


यावल : यावल तालुक्यातील चिंचोली गावापासून जवळ असलेल्या आडगाव चौफुलीवरून अज्ञात चोरट्याने दुचाकी लांबवली. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

चिंचोली, ता.यावल या गावाजवळ आडगाव फाटा असून आडगाव फाट्याच्या चौफुलीवर शेताच्या बांधाला किरण सुरेश कोळी (पाटील वाडा, चिंचोली, ता.यावल) यांनी आपली मोटरसायकल (एम. एच. 19 बी.के. 8394) ही लावली होती. अज्ञात चोरट्याने त्यांची मोटरसायकल लांबवली. हा प्रकार हा निदर्शनास आल्यानंतर त्यांनी यावल पोलीस ठाणे गाठत गुन्हा दाखल केला. तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार वासुदेव मराठे करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !