भरधाव इर्टीकाने उडवले : कर्कीतील विवाहितेचा मृत्यू
Irttika blew up the rush: Death of a married woman in Karki मुक्ताईनगर : भरधाव इर्टीका वाहनाने धडक दिल्याने कर्की येथील 40 वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाला. हा अपघात शनिवार, 1 जुलै रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडला. राधाबाई राणा उर्फ संतोष भिलाले (40, कर्की) असे मयत विवाहितेचे नाव आहे.
ईर्टीका चालकाविरोधात गुन्हा
अपघात प्रकरणी ईर्टीका (एम.एच.19 सी.व्ही.5158) वरील चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. राधाबाई या शनिवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास कर्की फाट्याकडे शौचास जात असताना ईर्टीका चालकाने जबर धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी संतोष बहारीया भिलाले (28, बर्हाणपूर, ह.मु.कर्की) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार अशोक जाधव करीत आहेत.
