भुसावळ शहरातील विवाहितेचा विनयभंग : एकाविरोधात गुन्हा
Molestation of married woman in Bhusawal city: Crime against one भुसावळ : शहरातील एका भागातील 23 वर्षीय विवाहितेचा विनयभंग करीत पतीला शिविगाळ केल्याप्रकरणी नात्यातील चुलत दिराविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
एकाविरोधात गुन्हा दाखल
शहरातील एका भागातील 23 वर्षीय विवाहिता पतीसह वास्तव्यास असून मंगळवार, 4 रोजी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास संशयित शेख जाफर शेख हसन (मुस्लीम कॉलनी, उस्मानिया मशिदीजवळ भुसावळ) याने भिशीचे राहिलेले उर्वरीत पैसे मागण्याच्या कारणावरून दाम्पत्याला शिविगाळ केली तसेच विवाहितेच्या मनाला लज्जा निर्माण होईल, असे वर्तन केले. तपास नाईक तुषार इंगळे करीत आहेत.
संशयिताने केला मारहाण झाल्याचा आरोप
संशयित शेख जाफर शेख हसन यांनीदेखील विवाहितेच्या पतीविरोधात मारहाणीचा आरोप करीत तक्रार दाखल केल्यावरून भादंवि 324 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. अॅडव्हान्स घेतलेले पैसे परत कर अन्यथा कामावर ये असे म्हटल्याच्या वादातून विवाहितेच्या पतीने चापटा-बुक्यांनी मारहाण केली तसेच ओठावर, कपाळावर, डोळ्याच्या बाजूला मारून दुखापत केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तपास नाईक शशिकांत तायडे करीत आहेत.
