राज्य विज्ञान शिक्षण संस्थेत जळगाव जिल्ह्यातील दोघांचा गौरव


भुसावळ : इन्स्पायर अवॉर्ड मानकाबाबत नुकतीच नागपूर येथील रवी नगरात राज्य विज्ञान व गणित संस्थेत बैठक झाली. या बैठकीमध्ये जळगाव जिल्ह्यात गतवर्षी विविध विज्ञान विषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांचा उल्लेख होऊन या ठिकाणी महात्मा गांधी विद्यालय वरणगावचे उपशिक्षक इन्स्पायर अवार्ड जिल्हा प्रसारक सुनील वानखेडे व सहप्रसारक आभोडे, ता.रावेर येथील एन.एन.अकोले विद्यालयाचे उपशिक्षक संदीप पाटील यांचा गौरव करण्यात आला.

नागपूरात विशेष सत्राचे आयोजन
इन्स्पायर अवॉर्ड मानक नोंदणी सुरू झाली आहे. नोंदणी अंतर्गत विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन वाढावा यासाठी नाविन्यपूर्ण संकल्पनेसाठी शासनाकडून विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये बँकेच्या खात्यावर दिले जातात यासाठी नाविन्यपूर्ण संकल्पना असणे आवश्यक आहे. ही निवड करण्यासाठी गांधीनगर गुजरात येथील एनआयएफ फाउंडेशनच्या वतीने निवड प्रक्रिया राबवली जाते. 2023-24 मध्ये राबविण्यात येणार्‍या या उपक्रमासाठी महाराष्ट्रातून चांगल्या समाज उपयोगी व देशाच्या हिताच्या वैज्ञानिक संकल्पना नोंदवण्यासाठी विशेष सत्राचे आयोजन नागपूरच्या रवी नगरातील राज्य विज्ञान गणित संस्थेत करण्यात आले. या ठिकाणी एनआयएफचे माजी वैज्ञानिक डॉ.रश्मी कोल्हे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी राज्य विज्ञान गणित संस्थेचे संचालक डॉ.रत्ना गुजर, राज्य विज्ञान पर्यवेक्षक राजीव नेब, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील प्रतिनिधी उपस्थित होते.

यांची होती उपस्थिती
यावेळी वरणावच्या महात्मा गांधी विद्यालयाचे उपशिक्षक तथा इन्स्पायर अवॉर्ड मानक प्रसारक सुनील वानखेडे, सहप्रसारक आभोडे, ता.रावेर येथील एन.एन.अकोले विद्यालयाचे संदीप पाटील यांचा गौरव राज्य विज्ञान शिक्षण संस्थेचे संचालक डॉ.रत्ना गुजर, विज्ञान पर्यवेक्षक राजीव नेब, राज्य प्रसारक भारतकुमार लाड, सह प्रसारक रवींद्र भास्कर आदी मान्यवर उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !