इनरव्हील रेल सिटीच्या अध्यक्षपदी रेवती मांडे व सचिवपदी सीमा सोनार
भुसावळ : इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेलसिटी नूतन पदाधिकार्यांचा पदग्रहण समारंभ बुधवार, 5 रोजी संध्याकाळी प्रभाकर हॉलमध्ये झाला. नूतन अध्यक्ष म्हणून रेवती मांडे यांनी तर सचिव म्हणून सीमा सोनार यांनी मावळत्या अध्यक्ष आणि सचिव यांच्याकडून पदभार स्वीकारला.
यावेळी नवीन आठ सदस्यांचा प्रवेश झाला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून रजनी सावकारे, रश्मी शर्मा व रत्नकान्ता अग्रवाल उपस्थित होत्या. यावेळी मागील वर्षांचा आढावा व पुढील वर्षांचे नियोजन सादर करण्यात आले.

