कुलर सुरू करताना अंगावर पडले : यावल शहरातील प्रौढाचा शॉक लागताच मृत्यू
Cooler falls on body while starting: Adult dies of shock in Yaval city यावल : विद्युत शॉक लागल्याने शहरातील पंचशील नगरात 55 वर्षीय इसमाचा मृत्यू ओढवला. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिलिंद अंबादास गजरे (55) असे मयताचे नाव आहे.
अंगावर कुलर पडताच शॉक लागल्याने मृत्यू
गजरे हे आपल्या घरी कुलर सुरू करीत असताना कुलर त्यांच्या अंगावर कोसळले आणि यात विद्युत शॉक लागून ते बेशुद्ध पडले. तातडीने ग्रामीण रुग्णालयात हलवले असता डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी यावल पोलिसात शालु मिलिंद गजरे यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास सहायक फौजदार विजय पाचपोळे करीत आहे.
