डांभूर्णी शेत-शिवारातून स्पिंकलर व पाईप चोरी : दोघांविरुद्ध गुन्हा


Theft of sprinkler and pipe from Dambhurni farm:  Crime against both यावल : यावल तालुक्यातील डांभुर्णी या गावातील शेतकर्‍यांच्या शेतातून दोन जणांनी 30 नग स्पिंकलर व 30 नग पाईप असा मुद्देमाल लांबवला. चोरी केलेले साहित्य घेऊन पसार होतांना दोघांना शेतकर्‍याने पकडले व या दोघांना यावल पोलिसांच्या स्वाधीन करीत त्यांच्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला.

संशयितांना चोरी करताना पकडले
डांभूर्णी येथील शेतकरी कपिल मधुकर सरोदे यांच्या शेत गट क्रमांक 735 / 1 मध्ये त्यांनी स्पिंकलर ठेवले होते व शेतात पीयूसी पाईपदेखील होते. शेतातून 30 नग स्पिंकलर व 30 नग पीव्हीसी पाईप घेऊन अनिल नारायण बारेला (रा.सांगवी, ता.जि.धुळे) व करण बारेला हे दोन जण चोरी करून नेत असताा चोरी करून साहित्य नेत असतांना शेतकर्‍याने त्यांना दोघांना रंगेहाथ पकडले व यावल पोलिसांना माहिती दिली. यावल पोलीस ठाण्यात दोघाविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार असलम खान करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !