मोहराळ्यातील तरुणावर सोशल मिडीयावर टाकला भावना दुखावणारा मजकूर : यावल पोलिसांकडून कारवाई
Injurious text posted on social media against young man in Moharala : Action by Yaval police
यावल : तालुक्यातील मोहराळा येथील एका तरुणाने दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल व एका धर्माच्या धार्मिक भावना दुखावतील अशा पद्धतीचे सोशल नेटवर्कवर स्टेटस ठेवल्याने या तरुणाविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
जमाव आक्रमक : कठोर कारवाईची केली मागणी
मोहराळे येथील नागेश्वर उर्फ नागो कैलास अडकमोल या तरुणाने आपल्या मोबाईलवर एका धर्माच्या धार्मिक भावना दुखावतील अशा प्रकारचे स्टेटस ठेवल्याने दोन समाजातील तेढ निर्माण होईल, असे कृत्य निदर्शनास आल्यानंतर मोठ्या संख्येत नागरीकांचा जमाव यावल पोलीस ठाण्यात दाखल झाला. यावल पोलीस ठाण्यात मोहराळा पोलीस पाटील युवराज पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नागेश्वर उर्फ नागो अडकमोल या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहासक फौजदार नितीन चव्हाण करीत आहेत.
