भुसावळातील मातृभूमी चौकात दोघांनी डीजे वाहन पेटवले : आठ लाख रुपयांचे नुकसान


Two set DJ vehicle on fire at Mathrubhoomi Chowk in Bhusawal: Loss of Rs eight lakh भुसावळ : शहरातील जय मातृभूमी चौकात दोघांनी डीजे आयशर वाहनाला आग लावून पेटवल्याने आठ लाखांचे नुकसान झाले. याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

दोघांविरोधात गुन्हा दाखल
मातृभूमी चौकात विठ्ठल मंदिराजवळ आयशर (एम.एच.02 टी.7338) या वाहनावर डीजे सिस्टम होती. स्पिकर व वायरींग मिळून आठ लाखांचे साहित्य त्यावर होते मात्र गुरुवारी रात्री 11.57 ते शुक्रवारी सकाळी 10.30 या दरम्यान चेतन उर्फ गोल्या पोपट खडसे (रा. हनुमान नगर, भुसावळ) व गोलू सुलतान (रा. श्रीरामनगर, चमेली नगर, भुसावळ) यांनी डीजेचे साहित्य असलेली आयशर गाडी पेटवून दिली. या लावलेल्या आगीत गाडी व डीजेचे साहित्य जळून खाक झाल्याने आठ लाखांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी पंकज अरुण कोलते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून येथील बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुनील जोशी करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !