अकलूद नाक्याजवळ अवैद्य गौण खनिज वाहतूक करणारे डंपर पकडले
यावल : यावल तालुक्यातील भुसावळ येथील तापी नदीच्या अलीकडे असलेल्या अकलूद जवळील नाक्यावर अवैध गौण खनिज वाहतूक करणारे डंपर पकडण्यात आल्यानंतर अवैधरीत्या गौण खनिजाची वाहतूक करणार्यांच्या गोटात खळबळ उडाली आहे. ही कारवाई तहसीलदारांनी करीत डंपर मालकाला दंडाची नोटीस बजवण्याची कार्यवाही सुरू आहे.
कारवाईने उडाली खळबळ
अकलूद, ता.यावल या गावाजवळ तापी नदीच्या पुलाच्या अलीकडे नाका आहे. या नाक्याजवळ यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी गुरुवारी सायंकाळी अवैध गौण खनिज वाहतूक करणारे डंपर (क्रमांक एम. एच. 19 सी. वाय. 2450) पकडले तर संंबंधिताकडे परवाना नसल्याने डंपर तहसीलदार नाझीरकर यांनी तलाठी एस. व्ही. सूर्यवंशी, तलाठी ईश्वर कोळी, अतुल बडगुजर यांच्या मदतीने यावल तहसील कार्यालयात जमा केले. डंपर मालक बी.एन.अग्रवाल यांना दंडाच्या संदर्भात नोटीस बजावण्यात आली. या कारवाईमुळे अवैध गौण खनिज वाहतूकदारांमध्ये खळबळ उडाली आहे.

