भुसावळात अवैध गौण खनिज वाहतूक करणारे डंपर जप्त


भुसावळ : भुसावळातील नूतन तहसीलदार निता लबडे व सहकार्‍यांनी शहरातील खडका रोडवर गुरूवारी संध्याकाळी अवैध गौण खनिजची वाहतूक करीत असलेले डंपर पकडल्याने अवैध वाळू वाहतूकदार धास्तावले आहेत.

नियमित कारवाई करण्याची पर्यावरणप्रेमींची मागणी
प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार निता लबडे यांनी अवैध गौण खनिज वाहतूकीवर आळा बसवण्यासाठी गुरूवार, 6 जुलै राष्ट्रीय महामार्ग सहावरील खडका चौफुलीच्या जवळ साकेगाव येथील रहिवासी मनोज हरलाल परदेशी हे डंपर (एम.पी.47 एच.240) द्वारे अवैध गौण खनिज वाहतूक करताना आढळल्याने डंपर जप्त करून तहसील कार्यालयाच्या आवारात जमा करण्यात आले. ही कार्यवाही मंडळाधिकारी एफ.एस.खान, प्रफुल्ल कांबळे, मिलिंद तायडे, तलाठी नितीन केले, तलाठी पवन नवगाळे, तलाठी मंगेश परीसे, तलाठी बाळासाहेब गायकवाड, जितेश चौधरी यांनी ही कारवाई केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !