भुसावळ रनर्सचे सदस्य अमरनाथ यात्रेसाठी रवाना
भुसावळ : हिंदू बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या अमरनाथ यात्रेला प्रारंभ झाला असून ही यात्रा 1 जुलै ते 31 ऑगस्ट दरम्यान भाविकांसाठी सुरू राहणार असून अमरनाथ यात्रेसाठी भुसावळातील रनर्स ग्रुपचे सदस्य नुकतेच रवाना झाले.
श्रीनगर येथे सुमारे तीन हजार 888 मीटर उंचीवर असलेल्या या पवित्र ठिकाणी दर्शनासाठी केवळ हाच काळ योग्य आहे. गुफा केवळ सदरच्या काळात खुली असल्याने पहलगाम व बालतान या दोन्ही मार्गे यावर्षीची यात्रा सुरु आहे. भुसावळ शहरातील 21 नागरीक या यात्रेसाठी रवाना झाले असून यातील बहुसंख्य हे भुसावळ स्पोर्ट्स अॅण्ड रनर्स असोसिएशनचे नियमित धावपटू आहेत.

भुसावळून 21 भाविक रवाना
भुसावळ शहरातील पांडुरंग टॉकिज समोरील रहिवासी सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी आनंदा शिंदे यांनी शहरातून जुलै 2004 पासून अमरनाथ यात्रेला सुरुवात केली. पहिल्या वर्षी ते 35 भाविकांना घेऊन गेले होते. नंतर 18 वर्षात 425 भाविकांनी त्यांच्या सहकार्यातून अमरनाथ दर्शन घेतले. यंदादेखील सर्व 21 भाविकांनी दर्शनासाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे. शिवाय जिल्हा शल्य चिकित्सकांचे तंदुरुस्ती प्रमाणपत्र घेतले आहे. या सर्व प्रक्रिया करण्यासाठी आनंदा शिंदे यांच्यासोबत भुसावळ स्पोर्ट्स अॅण्ड रनर्स असोसिएशनचे नियमित धावपटू प्रवीण वारके, रनजीत खरारे यांनी यावेळी परीश्रम घेतले. चेतन राठोड, मुकेश चौधरी, अजय आंबेकर, किशोर तळेले, कुणाल कोलते, योगेश चौधरी, दिनेश वारके, सचिन चौधरी, चेतन वारके हे सर्व भाविक अमरनाथ यात्रेला रवाना झाले आहेत.
