बोदवड तालुक्यात पावसाने नुकसान : आमदारांकडून पाहणी


बोदवड : बोदवड तालुक्यात नुकतीच पावसाने दमदार हजेरी लावली तर बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस पडल्याने दुबार पेरणीचे संकट टळले असले तरी कुर्‍हाहरदो, शेवगा व धोंडखेडा येथे झालेल्या ढगफुटी व अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांना जोरदार फटका बसला आहे.

घरांसह पिकांचे झाले नुकसान
पावसाचा जोर जास्त असल्याने शेतातील माती वाहून गेली आहे. गावातील घरांचे नुकसान झाले आहेत. पिके मोठ्या प्रमाणात वाहून गेली असून शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसाच्या आगमनाची आतुरता शेतकर्‍यांना लागली असतानाच बहुतांश भागात मध्यम स्वरुपाचा पाऊस झाल्याने दुबार पेरणीचे संकट टळले मात्र कुर्‍हा हरदो, शेवगा व धोंडखेडा येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे तर उजनी जंगल परीसरात बर्‍याच शेतकर्‍यांनी कपाशीचे जंगली प्राण्यांनी नुकसान केले आहे. शेतकरी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत आमदार चंद्रकांत पाटील यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत शेतीच्या व घरांच्या नुकसानीबाबत पंचनामे करण्याच्या सूचना अधिकार्‍यांना देऊन लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळण्यासाठी प्रस्ताव शासनाकडे पाठवावा, अश्या सूचना केल्या आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !