हिंगणा येथील अल्पवयीन मुलाला पळवले
A minor boy from Hingana was abducted बोदवड : बोदवड तालुक्यातील हिंगणा येथील अल्पवयीन मुलास अज्ञाताने फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार समोर आला असून या प्रकरणी बोदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. निखील गणपत बोदळे (16) असे अपहरण झालेल्या बालकाचे नाव आहे.
बोदवड पोलिसात गुन्हा दाखल
विलास पंडित होडगरे (32, हिंगणा) यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा भाचा निखील बोंदळे याने तक्रारदाराचे वडिल पंडित होडगरे यांना आमदगाव येथे जात असल्याचे सांगून बाहेर पडला मात्र घरी परतला नाही. हा प्रकार शुक्रवार, 7 जुलै रोजी दुपारी साडेचार वाजता घडला. तपास हवालदार अय्युब गंभीर तडवी करीत आहेत.
