भुसावळातील श्रीनगरातील शासकीय योजनांच्या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद


Spontaneous response to government scheme camp in Bhusawal, Srinagar भुसावळ : शहरातील श्री नगर भागात नागरीकांसाठी शासकीय योजनांचे शिबिराचे आयोजन आमदार संजय सावकारे यांच्या नेतृत्वाखाली माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, शहराध्यक्ष परीक्षित बर्‍हाटे, माजी नगरसेविका अनिता सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या शिबिरात रेशनकार्डचा 12 अंकी क्रमांक मिळवणे, धान्य मिळण्याच्या प्राधान्य योजनेत नाव समाविष्ट करणे, नवीन रेशनकार्ड तयार करणे, रेशनकार्डमध्ये नाव वाढविणे, नाव कमी करणे, हरवलेले किंवा फाटलेले रेशनकार्डाचे नूतनीकरण करणे या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. सोबतच एसटी महामंडळ आणि महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषणच्या सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना केशरी शिधापत्रिका मिळण्यासाठी अर्ज भरून देण्याची व्यवस्था करण्यात आली. या शिबिरात 156 नागरीकांनी विविध प्रकारच्या सुविधांचे अर्ज भरले.

यावेळी यांची होती उपस्थिती
प्रसंगी समाजसेवक सतीश सपकाळे, भाजप कार्यकर्ते प्रा.धीरज पाटील, गोकुळ बाविस्कर, भाजपा महिला शहराध्यक्ष अनिता आंबेकर, भाजप युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष अमोल पाटील, गिरीष राणे, विकास सपकाळे, अमोल झटकार आदींची उपस्थिती होती.

शासनाच्या विविध योजना एकाच ठिकाणी
आर्थिकद़ृष्ट्या मागासलेले आणि वंचित नागरीकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात अनेक कठीण परीस्थितीचा आणि अनेक आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो म्हणून महाराष्ट्र व केंद्र शासनाच्या शासकीय इंदिरा गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, प्रधानमंत्री आवास योजना, रहिवासी व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, जेष्ठ नागरिक प्रमाणपत्र, जातीचा दाखला, नॉन क्रिमिलेयर, उत्पन्न दाखला, आरोग्य दाखला संबंधित सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे समाजसेवक सतीश सपकाळे यांनी सांगितले.

उद्याही स्वीकारणार कागदपत्रे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार समाजातील अत्यंत गरीब, वंचित वर्गातील नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सर्वांगीण कल्याणाच्या दृष्टीकोनातून विविध सामाजिक कार्यक्रम आणि विविध योजनांच्या माध्यमातून देशातील आर्थिक दुर्बल वर्गातील नागरीकांना सर्व मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करीत आहे. नागरीकांच्या मागणीनुसार बुधवार, 12 जुलै 2023 रोजी सकाळी 9 ते 11 दरम्यान पुन्हा कागदपत्रे स्वीकारणार आहे. परीसरातील जास्तीत-जास्त नागरीकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन असल्याचे संयोजक भाजप कार्यकर्ता प्रा.धीरज पाटील यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 7709044904 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे ते कळवतात.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !