वनजमिनी मिळत असल्याची अफवा ; ग्रामस्थांच गारबर्डीच्या जंगलात डेरा


Rumors of getting forest land ; Villagers camped in Garbardi forest पाल : येथून जवळ असलेल्या गारबर्डी रस्त्यालगत कम्पार्टमेंट नंबर 28 या वनक्षेत्रात वनजमिनी मिळत असल्याचा अफवेने संपूर्ण गावातील ग्रामस्थांनी हातात कुर्‍हाड व विळा घेऊन या वनजमिनीवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या राखीव वनजमिनीवर हल्ली प्रत्येकानीं आपला हक्क दर्शवला आहे.

वनजमिनीवर अतिक्रमणाने खळबळ
या भागात राखीव वनक्षेत्रात परप्रांतीय व बाहेर गावातून आलेल्या ग्रामस्थांना तथा खोट्या दावेदारांना जमिनी मिळत असल्याने याबाबत रोष व्यक्त होत आहे. स्थानिक लोकांना वनजमिनी मिळाव्यात या हेतूने जवळपास 90 ते 100 हेक्टर जमिनीवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न झाल्याची बाब समोर आली आहे. सकाळी आठ वाजेपासून ते संध्याकाळपर्यंत नागरिकानीं वनजमिनीवर ताबा केल्याचे माहिती आहे. गावातील महिला लहान मुले, मुली देखील अतिक्रमण करताना सहभागी झाले हे विशेष! गावातील नागरीक या वनक्षेत्रात अतिक्रमणाचा ताबा घेत असल्याची बातमी वन्यजीव वनविभागाच्या कर्मचार्‍यांना कळताच त्यांनी धाव घेतली मात्र ग्रामस्थांचा अवतार व हातातील शस्त्र पाहून त्यांनी काढता पाय घेतला.

पथकावर झाला होता हल्ला
गेल्या दोन महिन्यांपूर्वी परीसरातील गारबर्डी-लोहारा येथील राखीव वनक्षेत्रातील अनधिकृत अतिक्रमण कारवाई करण्याचा प्रयत्न करणार्‍या वनअधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या पथकावर हल्ला झाला होता. अनेकदा असे प्रकार घडत असल्याचे दिसून येते. पोलिसांचा बंदोबस्त वेळेत मिळत नसल्याने वनविभागाच्या कारवाईला खीळ बसत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !