वढोदा येथे अल्पवयीन तरुणीचा विनयभंग


A minor girl was molested in Wadhoda मुक्ताईनगर : तालुक्यातील वढोदा येथे 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकाविरोधात मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

तरुणाविरोधात गुन्हा दाखल
17 वर्षीय पिडीतेच्या तक्रारीनुसार, अमोल सोनाजी सावे (22) याने सोमवार, 10 रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास पीडीता ही घरी एकटी असताना तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला तसेच पीडीतेकडे शरीरसुखाची मागणीही केली. पीडीतेने हा प्रकार कुटूंबियांना कळवल्यानंतर संशयिताविरोधात बुधवारी मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक निरीक्षक संदीप दुनगहू करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !