भुसावळात अवैधरीत्या बायोडिझेल विक्री : एकाविरोधात गुन्हा


Illegal sale of biodiesel in Bhusawal : Crime against one भुसावळ : शहरातील महामार्गावरील चहल ढाब्यावर अनधिकृतरीत्या बायोडिझेलची पंपाद्वारे विक्री सुरू असल्याची तक्रार जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्याकडे करण्यात आली होती. पुरवठा विभागाला या संदर्भात जिल्हाधिकार्‍यांनी निर्देश दिल्यानंतर पथकाने 30 जून रोजी दुपारी 12.35 वाजता खातरजमा केल्यानंतर पंपाला सील ठोकले होते. या प्रकरणी संबंधिताला नोटीस बजावल्यानंतर 11 जुलै रोजी प्रांताधिकार्‍यांकडे सुनावणी झाली.

संबंधिताकडे बायोडिझेल पंप चालवण्याबाबत कुठलीही अधिकृत परवानगी नसल्याचे सिद्ध झाल्याने बुधवार, 12 रोजी पुरवठा अधिकारी अतुल वाकोजी नागरगोजे यांच्या फिर्यादीवरून संशयित शेख रईस शेख रशीद (ग्रीन पार्क, खडका रोड, भुसावळ) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक मंगेश गोंटला करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !