मनवेल येथे भुरट्या चोरट्यांचा धुमाकूळ : जि.प.शाळेत साहित्य चोरीचा प्रयत्न


यावल : यावल तालुक्यातील मनवेल येथील जिल्हा परीषद शाळेतील भंगार खोलीत भुरट्या चोरांच्या धुमाकुळ सुरू असल्याचे शाळेतील शिक्षकांच्या निर्दशनास आले आहे.

शालेय समितीकडे तक्रार
गेल्या दोन दिवसांपासून शाळेतील भंगार असलेल्या खोलीच्या दरवाज्याचे कडी-कोयंडा तोडून चोरीचा प्रयत्न झाल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत शालेय समिकडे तक्रार देण्यात आली आहे. मनवेल, ता.यावल या गावात जिल्हा परीषद शाळा आहे. या शाळेतील एक खोली रीकामी असून विविध प्रकारचे खराब बेंचेस, लोखंडी साहित्यासह विविध भंगार यात ठेवलेले आहे. या खोलीमधील भंगार साहित्य चोरीचा प्रयत्न उघडकीस आला आहे. अज्ञात भुरट्या चोरट्यांनी शाळेच्या दरवाज्याचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न केला. हा प्रकार मुख्याध्यापकांच्या निर्दशनास आला. याबाबत मुख्यध्यापकांनी गावातील शालेय समितीकडे याबाबत तक्रार केली आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !