पैसे खाली पडल्याचे सांगून एक लाख 35 हजारांची रोकड लांबवली : वरणगावात खळबळ
Cash of 1 lakh 35 thousand was extended by saying that the money had fallen : Excitement in Varangaon भुसावळ : पैसे खाली पडले असल्याचे भासवून भामट्याने स्कुटीला लावलेली एक लाख 35 हजार रुपयांची रोकड असलेली पिशवी लांबवली. ही घटना शुक्रवार, 14 जुलै रोजी सकाळी अकरा वाजता बेंडाळे हॉस्पीटलबाहेर घडली. या प्रकरणी वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
टोळी कार्यरत झाल्याचा संशय
प्रमोद तावडे हे बेंडाळे हॉस्पिटलमध्ये मेडिकल स्टोअर्समध्ये कामाला असून त्यांना डॉक्टरांनी एक लाख 35 हजार रुपये बँकेत भरणा करण्यासाठी दिले होते. सेंट्रल बँकेत गेल्यानंतर स्लीपवर अकाउंट नंबर भरलेला नसल्याने परत आल्यानंतर दीपेश पाटील यांनी अकाउंट नंबर टाकून दिला. त्यानंतर हॉस्पीटलबाहेर स्कुटीजवळ एक 30 ते 35 वयोगटातील व्यक्तीने त्यांना तुमचे पैसे पडल्याचे सांगितले व त्याचवेळी स्कुटीस लावलेली रोकड असलेली पिशवी लंपास करण्यात आली. या प्रकरणी प्रमोद तावडे यांच्या फिर्यादीवरून वरणगाव पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
