आक्षेपार्ह स्टेटस ठेवले : न्हावीतील तरुणाच्या घरावर संतप्त जमावाची दगडफेक


Offensive status kept : An angry mob pelted stones at the house of a young man in Nawi यावल : तालुक्यातील न्हावी गावातील एका तरुणाने भावना दुखावतील, असे आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यानंतर संतप्त जमावाने तरुणाच्या घरावर दगडफेक केली. या संदर्भात जमावाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
न्हावी, ता.यावल येथील रहिवासी व जळगाव येथे वैद्यकीय शिक्षण असलेला तरुण मोहम्मद शाहिद शेख अब्दुल रहिम याने एका समाजाच्या देवतांबाबत आक्षेपार्ह असणारे स्टेटस ठेवल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर त्यास अटकही करण्यात आी.

न्हावीत उमटले पडसाद
या प्रकरणाचे पडसाद न्हावी येथे उमटले. गावातील काही तरुणांनी अटकेत असलेल्या संशयीत तरुणाच्या घरावर दगडफेक करून त्याची आई व कुटूंबांशी वाद घातला. घरासमोरील मोटरसायकलची दगडाने तोडफोड करीत नुकसान केले. याबाबत फैजपूर पोलिसात दीपक शोभाराम नारवे, विशाल उर्फ पाहाडी त्र्यंबक भोंगे, तुषार कैलास जिरे, वासुदेव भोंगे (पूर्ण नाव माहित नाही) व हर्षल किरण निंबाळकर (उर्फ अंडेवाला) यांच्यासह सुमारे 30 ते 40 अज्ञात जमावाच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी हर्षल किरण निंबाळकर (उर्फ अंडेवाला) याच्या इतर चार जणांना फैजपुर पोलिसांकडून अटक करण्यात आलीण दरम्यान न्हावी गावात तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. फैज्पूर विभागाचे पोलीस अधिकारी डॉ.कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली फैजपूरचे सहाय्यक पोलीस निरिक्षक निलेश वाघ, सावदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर फळे यांच्यासह पोलिसांचा बंदोबस्त चोख लावण्यात आला आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !