कंडारीतील युवकाचा कुलरचा शॉक लागल्याने मृत्यू


Youth in Kandari dies due to shock from cooler
भुसावळ : 
भुसावळ तालुक्यातील कंडारी येथील युवकाचा कुलरचा विद्युत शॉक लागल्याने मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी पावणेअकरा वाजता घडली. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. किशोर विनोद परदेशी (23, रा.जैतवन बुद्ध विहाराजवळ, भुसावळ) असे मृत तरुणाचे नाव आहे.

अंगावर कुलर पडताच शॉक लागून मृत्यू
किशोर विनोद परदेशी हा तरुण परीवारासह भुसावळ शहरालगतच्या कंडारी येथील जेतवान बुध्द विहार परीसरात वास्तव्यास होता. रविवारी सकाळी पावणेअकरा वाजता कुलर सुरू करताना शॉक लागल्याने कुलर अंगावर पडल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला. नातेवाईकांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर तरुणास भुसावळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकार्‍यांनी मृत घोषित केले. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !