सावदा न.पा.उर्दू शाळेच्या वर्ग खोल्यांचे काम सुरू होणार ः आ.चंद्रकांत पाटील


सावदा : रावेर तालुक्यातील सावदा न.पा.उर्दू मुला-मुलींची शाळा असून वर्ग खोल्यांसह इमारत दुरुस्ती व बांधकाम तत्काळ सुरू करण्याचे आदेश संबंधितांना देण्याची विनंती शनिवार, 8 जुलै 2023 रोजी मुक्ताईनगर मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे समाजसेवक सोहेल खान सैदुल्ला खान यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने केली होती. हे काम एका महिन्यात सुरू करण्यात येईल, असे आश्वासन आमदार चंद्रकांत पाटील यांनी शिष्टमंडळाला दिले.

महिनाभरात काम सुरू करण्याचे आश्वासन
पावसाळ्यात शाळेच्या वर्ग खोल्यांमध्ये प्रचंड प्रमाणात पाणी गळती होते. यामुळे येथील लहान विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. या अनुषंगाने पालक वर्गाच्या मागणीनुसार जुलै 2022 मध्ये आमदार चंद्रकांत पाटील यांनी या शाळेस भेट दिली होती. शाळा इमारत व वर्ग खोल्याची अतिशय दयनीय अवस्था बघून त्यांनी याची दुरुस्ती व बांधकाम जलदगतीने मार्गी लावण्याचे नुसते आश्वासन न देता तत्काळ पुरेसा निधी देखील दिलेला होता.पंरतु एक वर्ष उलटूनही कामाची सुरुवात झाली नसल्याने पुन्हा पावसाळा सुरू झालयाने शाळा वर्ग खोल्यांमध्ये प्रचंड पाण्याची गळती सुरू झाली. याचा त्रास येथील पहिली ते सातवीच्या लहान विद्यार्थ्यांना पुन्हा सहन करण्याची वेळ आली. ही समस्या तत्काळ मार्गी लावण्यासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांनी संबंधितांना आदेश द्यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे सावदा येथील समाजसेवक सोहेल खान, फरीद शेख, युसूफ शाह, शेख निसार, शेख अनिस उर्फ अन्या, शेख कमरूद्दीन, शेख कलीम, शेख चाँद, शेख आबीद, शेख मोहसीन यांच्या शिष्टमंडळाने आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली असता त्यांनी शाळा वर्ग खोल्याचे काम एका महिन्यात सुरू करण्यात येईल, असे आश्वासन दिले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !