गारबर्डी धरणावर आमदार शिरीष चौधरी यांच्याहस्ते जलपूजन


सावदा : रावेर तालुक्यातील महत्वाचे असलेल्या सुकी धरणावर आमदार शिरीष चौधरी यांच्याहस्ते जलपूजन करण्यात आले. यावर्षी धरण क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसाने हे धरण लवकर भरले व नुकतेच हे धरण ओसंडून वाहू लागले. धरणाच्या सांडाव्यावरून चाळीस सें.मी.पाण्याचा सांडवा चालू आहे. धरण ओव्हरफ्लो झाले की शेतकरी सुखावतो व आनंदी होतो. धरण व पाण्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी जलपूजन केले जाते. यंदा आमदार शिरीष चौधरी व अरुणा चौधरी यांच्याहस्ते जलपूजन करण्यात आले.

यांची होती कार्यक्रमास उपस्थिती
जिल्हा परीषदेचे माजी सदस्य प्रभाकर अप्पा सोनवणे, सुरेखा नरेंद्र पाटील, रावेर नगराध्यक्ष दारा मोहंमद जफर मोहंमद, नगरसेवक अयुब मेंबर, यावल नगरसेवक समीर मोमीम, मनोहर सोनवणे, अनिल जंजाळे, असलम मेंबर, कदीर खान, पंचायत समितीचे माजी सदस्य योगेश सोपान पाटील, डॉ.राजेंद्र पाटील, बापू पाटील, तुकाराम बोरोले, केतन किरंगे, राजू सवर्णे, वाय.एस.महाजन, विवरे खुर्द संदीप पाटील, संजू जमादार, लियाकत जमादार, खिरोदा माजी सरपंच किशोर चौधरी, मनोज चौधरी, ललित चौधरी, तुकाराम बोरोले, व्ही.आर.पाटील, आर.एल.चौधरी, अजित पाटील आदी उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !