रोटरी क्लब ऑफ भुसावळचे पदग्रहण उत्साहात
Rotary Club of Bhusawal takes over with enthusiasm भुसावळ : रोटरी क्लब ऑफ भुसावलचे पदग्रहण शुक्रवारी रोटरी हॉलमध्ये उत्साहात पार पडले. यावेळी माजी अध्यक्ष ऋषी शुक्ला यांनी नूतन अध्यक्ष पदाचा पदभार विकास कात्यायनी यांना तर सेक्रेटरी पदाचा पदभार प्रकाश ठाकूर यांनी संजय चापोरकर यांना सोपवला.
सुरवातीला श्रृती कात्यायनी यांनी सरस्वती वंदना नृत्याच्या माध्यमातून सादर केली. यावेळी प्रमुख पाहणे म्हणून माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, आमदार संजय सावकारे, असि.गव्हर्नर प्रदीप पाटील, डिस्ट्रीक सेक्रेटरी प्रा.डॉ.रश्मी शर्मा उपस्थित होते. यावेळी आमदार संजय सावकारे यांनी रोटरीविषयी सखोल माहिती आणि रोटरीची कार्यपद्धती रोटरीत का यावे आंतरराष्ट्रीय स्तरावर रोटरीचे सामाजिक योगदान किती मोठे आहे याविषयी मार्गदर्शन केले. एजी प्रदीप पाटील यांनी या वर्षाची थीम आणि डीजी आशा वेणू गोपाल यांचा शुभेच्छा संदेश सांगितला. कार्यक्रम प्रसंगी चंद्रशेखर उपासनी व फालक यांना इंडक्ट करण्यात आले. याप्रसंगी राधेश्याम लाहोटी, बृजमोहन अग्रवाल, पांडूरंग राव, डॉ.राजेश पाटील, डॉ.सुशीलकुमार राणे, अरुण राठोड यांची विशेष उपस्थिती होती.
माजी गव्हर्नर राजीव शर्मा, रत्नकांता अग्रवाल, रजनी सावकारे, मनिषा पाटील, अलका भटकर, जी.आर.ठाकूर, राजश्री कात्यायनी, शीतल भराडे, रघुनाथ सोनवणे, आय.एस.पवार, रमेश पाटील, के.बी. जैन, अनिल पांढारकर, चांदमल चोपडा, नयन तायडे, भिका इंगळे, समीर मुजूमदार, जीवन चौधरी, राजेश अग्रवाल, महेश भराडे, प्रदीप दवे, दिलीप खंडेलवाल, रवींद्र शुक्ला, रूपेश जैन, मदन बोरकर, गोपाल तिवारी, सुहास मुळे, हेमंत नाईक, मंगला पाटील, मनिषा तायडे, अपर्णा उपासणी, ज्योती राठोड, अॅड.मनोज कात्यायनी, विभा कात्यायणी उपस्थित होते. सूत्रसंचलन गिरीष कुळकर्णी यांनी तर आभार डॉविकास कात्यायनी यांनी मानले. विविध सामाजिक संघटनेचे अध्यक्ष सचिव आणि भुसावळ येथील रोटरी क्लब, इनरव्हील, प्रतिष्ठा महिला मंडळचे पदाधिकारी कार्यक्रमाला उपस्थित होते.
